घाटंजी: अडान नदीपत्रातून रेतीची चोरी करणाऱ्या मांजर्डा येथील युवकाविरुद्ध घाटंजी पोलिसात गुन्हा दाखल
मांजरडा येथील आरोपी तनय महादेव पवार हा त्याच्या ताब्यातील ट्रॅक्टरमध्ये एक ब्रास रेती नदीपात्रातून चोरी करून घेऊन जात असताना पोलिसांना मिळून आला असता पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून रेती व ट्रॅक्टर असा एकूण पाच लाख सहा हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला.घाटंजी पोलिसात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.