"वर्धा जिल्ह्यातील काजळसरा येथे 'महात्मा फुले जनआरोग्य योजने' अंतर्गत भव्य मोफत आरोग्य शिबीर उत्साहात संपन्न झाले. सरपंच नंदाताई बिजवार यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या या शिबिरात १३० हून अधिक रुग्णांची तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी करण्यात आली. यावेळी ग्रामस्थांना शासकीय योजनांच्या लाभासाठी आवश्यक कागदपत्रांचे मार्गदर्शन करण्यात आले. ग्रामीण भागातील गरजू रुग्णांना दर्जेदार उपचार मिळाल्याने या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे."