चोपडा: चोपडा तालुक्यातील देवगाव या गावातून एम.जी. कॉलेज चोपडा येथे आलेली तरुणी बेपत्ता, चोपडा पोलिसात हरवल्याची तक्रार
Chopda, Jalgaon | Dec 11, 2025 चोपडा शहरात एमजी कॉलेज आहे.या कॉलेजमध्ये देवगाव ता. चोपडा येथून आलेली ऋतुजा विठ्ठल कुंभार वय १८ ही तरुणी बेपत्ता झाली आहे. या तरुणीचा सर्वत्र शोध घेण्यात आला नातेवाईकांकडे तपास केला मात्र ती कुठेच मिळून आली नाही. सर्वत्र शोध घेऊनही तरुणी कुठेच मिळून आल्याने चोपडा शहर पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे.