भुदरगड: तहसीलदार कार्यालय इमारत जतन करावी, तालुक्यातील स्वातंत्र्य सैनिकांच्या वारसांकडून जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना निवेदन
भुदरगड तालुक्यामध्ये सात हुतात्मांनी स्वातंत्र्य लढ्यात हुताम्य पत्कारले होते. त्यांच्या आठवणी तहसीलदार इमारतीच्या माध्यमातून आजही ताज्या आहेत. ही इमारत पाडून त्या ठिकाणी नवीन तहसीलदार कार्यालय बांधण्यात येणार आहे. याला भुदरगड तालुक्यासह जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिकांच्या वारसदारांनी विरोध केला आहे. ही इमारत जतन करावी व तहसीलदार कार्यालय अन्य ठिकाणी बांधावे, अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना १२ मार्च रोजी दुपारी १ वाजता दिले.