धुळे: राज्यात खरी लढत महायुतीतच; सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपचेच होणार, सोनगीर भागात जयकुमार रावळ यांचा दावा
Dhule, Dhule | Nov 30, 2025 राज्यात आगामी निवडणुकांमध्ये खरी लढत ही महायुतीमधील पक्षांमध्येच असून, राज्यात सर्वाधिक नगराध्यक्ष आणि नगरसेवक हे भारतीय जनता पार्टीचेच निवडून येतील, असा ठाम विश्वास राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावळ यांनी व्यक्त केला आहे. उत्तर महाराष्ट्र हा भाजपचा बालेकिल्ला असून, धुळे जिल्हा 'शतप्रतिशत भाजप' असल्याने जिल्ह्यातील चारही नगरपरिषदांवर भाजपचीच सत्ता येईल, असा दावा रावळ यांनी केला.