जालना जिल्ह्यात वारसा हक्काच्या फेरफार नोंदीसाठी लाच मागणार्या ग्राम महसूल अधिकार्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने यशस्वी सापळा कारवाई करत आरोपीला रंगेहाथ अटक केली आहे. बुधवार दि. 28 जानेवारी 2026 रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार ही कारवाई छत्रपती संभाजीनगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली आहे. या प्रकरणात आरोपी गजानन मनसाराम बारवाल, ग्राम महसूल अधिकारी, सजा सिंधी काळेगाव, असे आरोपीचे नाव आहे.तक्रारदाराच्या वडिलांचे निधन झाल्यानंतर वडिलोपार्जित शेती आहे.