डी.बी. सायन्स महाविद्यालय, गोंदिया येथे होणाऱ्या तीन दिवसीय हनुमंत कथेला प्रारंभ होण्यापूर्वी आज गोंदिया शहरात भव्य आणि भक्तिभावपूर्ण शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले. माँ जगदंबा मंदिर, दुर्गा चौक येथून या शोभायात्रेला मोठ्या उत्साहात प्रारंभ करण्यात आला. शोभायात्रे दरम्यान शहर "जय श्रीराम'' "जय हनुमान" च्या घोषणांनी दुमदुमून गेले होते. कथा वाचक वृंदावन येथील श्री आनंदम धाम ट्रस्टचे पीठाधीश्वर सद्गुरु श्री ऋतेश्वरजी महाराज यांचे भव्य स्वागत करण्यात आले. शोभायात्रा चांदणी चौक, गांधी प्र