औसा: पै.मयूर दुधनाळेची राष्ट्रीय पातळीवरील चमक,महाराष्ट्रासाठी कुस्ती स्पर्धेत ब्राँझ पदकाची कमाई,आ.पवारानी केल अभिनंदन
औसा -भारतीय जनता परिवारातील रामलिंग मुदगड गावचे सुपुत्र आणि उदयोन्मुख कुस्तीपटू पै. मयुर दुधनाळे याने शालेय राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत उत्कृष्ट खेळ करत महाराष्ट्राला अभिमानास्पद ब्राँझ पदक मिळवून दिले आहे. आपल्या दमदार तंत्र आणि जिद्दीच्या जोरावर मयूरने राज्याचे नाव गौरवाने उज्ज्वल केले.या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पै. मयुर, त्यांचे प्रशिक्षक तसेच दुधनाळे कुटुंबियांना औसा येथील आमदार अभिमन्यू पवार यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले.