हिंगणघाट: नारायणपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरला तीर्थक्षेत्र (क) दर्जा: पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रमाणात व ३० लक्ष निधी वितरण
हिंगणघाट विधानसभा श्रेत्राचे आमदार समिरभाऊ कुणावार यांच्या अथक प्रयत्नानंतर नारायणपूर येथील प्रति पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर तीर्थक्षेत्र (क) दर्जा प्राप्त झाला असून पालकमंत्री डॉ पंकज भोयर यांच्या हस्ते मंदिराच्या जिर्णोद्धारासाठी 30 लक्ष निधी प्रमाणपत्र वितरण करण्यात आल्याची माहिती विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थान कमिटीच्या वतीने देण्यात आली आहे. यावेळी पंकजजी भोयर यांचे हस्ते सरपंच सौ चित्रा पुसदेकर यांना प्रमाणात प्रदान करण्यात आले.