पवनी: अस्वलाच्या हल्ल्यानंतर ग्रामस्थांचा संताप उफाळला; वनविभागाच्या दिरंगाईवर प्रश्नचिन्ह
Pauni, Bhandara | Nov 30, 2025 कलेवाडा कमकाझरी परिसरात मागील काही दिवसांपासून बिबट्याच्या हालचालींमुळे निर्माण झालेल्या दहशतीच्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी वनविभाग अड्याळकडे पिंजरा लावण्याची मागणी केली होती. मात्र अद्याप विभागाकडून कोणतीही कारवाई न झाल्याने स्थानिकांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे. दरम्यान, 28 नोव्हेंबर 2025 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेजवळील शेतात काम करत असताना अस्वलाने मनोरमा मोरेश्वर घोगरे यांच्यावर अचानक हल्ला केला. या हल्ल्यात त्या गंभीररित्या जखमी झाल्या.