कोपरगाव तहसिल कार्यालयाच्या महसूल विभागाने गौन खनिजाच्या अवैध वाहतुकीवर कारवाई करत जप्त केलेल्या वाहनांचा आणि साधनांचा लिलाव करण्यात आला. या लिलाव प्रक्रियेत १९ जप्त साधनांपैकी ३ साधनांचा लिलाव झाला असून, महसूल विभागाने तब्बल ४ लाख १० हजार रुपयांचा महसूल वसूल केला आहे. तर उर्वरित वाहनांचा परिवहन विभागाकडून मूल्यांकन करून पुन्हा ६ ऑगस्ट रोजी या साधनांची लिलाव प्रक्रिया पार पडली जाणार असल्याची माहिती तहसीलदार महेश सावंत यांनी आज ३१ जुलै रोजी दुपारी दिली आहे.