आम आदमी पार्टीने राज्यात नगरपंचायतच्या माध्यमातून खाते खोलले असल्याने ही चांगली सुरुवात पक्षाची झाली आहे, नेवासा शहराच्या विकासासाठी सहकार्याची भूमिका पक्षाची असेल. असे मत महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अजित फाटके यांनी व्यक्त केले आहे. नेवासा येथे नगरसेविका शालिनी सुखदान व अॅड. संजय सुखदान दाम्पत्याचा गौरव करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.