धुळे: धुळ्यात 'गावी जातो' सांगून घरातून निघालेल्या व्यक्तीचा विहिरीत आढळला मृतदेह; जुने धुळे परिसरातील घटना
Dhule, Dhule | Dec 1, 2025 जुने धुळे येथील सरोदे कॉलनीत ५४ वर्षीय दगडू महादू शिंपी यांचा मृतदेह घराजवळील विहिरीत आढळल्याने खळबळ उडाली. दोन दिवसांपूर्वी त्यांनी घरच्यांना ‘गावी जातो’ सांगून घर सोडले होते. आज त्यांचा मृतदेह सापडताच माजी नगरसेवक देवा दादा सोनार यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन मदतकार्य केले व नागरिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला. या प्रकरणी आझाद पोलिस तपास करत आहेत.