पोलादपूर तालुक्यातील कोंढवी आठगाव येथे भैरी मंदिरासमोरील सभामंडपाच्या बांधकामाचा शुभारंभ आज मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. सुंदर अश्या उभारण्यात येत असलेल्या नूतन मंदिरा समोरील या सभामंडपामुळे गावातील धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांसाठी उत्तम सुविधा उपलब्ध होणार असून ग्रामविकासाला चालना मिळणार आहे. या कार्यक्रमासाठी कोंढवी विभागातील तसेच पोलादपूर तालुक्यातील शिवसेना, युवा सेनेचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.