साकोली तालुक्यातील सानगडी परिसरात शाळकरी मुलींना चाकूचा धाक दाखवून धमकवण्याची गंभीर घटना सातत्याने घडत असून या परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.पोलीस प्रशासनाने गस्त घालून या प्रकाराचा बंदोबस्त करावा अशी मागणी करणारे निवेदन पालक व शिक्षकांनी रविवार दिनांक 28 डिसेंबरला दुपारी चार वाजता साकोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महादेव आचरेकर यांना दिले आहे