देवळाली नगरपालिका निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या झालेल्या पराभवाची नैतिक जबाबदारी आम्ही स्वीकारत आहे. माञ या निवडणुकीमध्ये मतदानाच्या दिवशी सरकारी यंत्रणेचा अतिशय गैरवापर झाला असून हा गैरवापर लोकशाहीला घातक असल्याचा आरोप शिवसेनेचे नेते प्रशांत मुसमाडे यांनी केला आहे. आज सोमवारी सायंकाळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी म्हटले आहे की, देवळाली नगरपालिकेत झालेला पराजय हा मतदारांचा नसून हा यंत्रणेचा गैरवापर आहे.याबाबत आपण तक्रार देखील करणार आहोत.