यावल पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या खळबळजनक जबरी चोरीच्या गुन्ह्याचा जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने अत्यंत शिताफीने तपास लावून ३ सराईत आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईत पोलिसांनी आरोपींकडून लुटीतील तब्बल १३ लाख रुपयांची रोकड हस्तगत केली आहे. अशी माहिती पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी शनिवारी २ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजता दिली आहे.