अकोला: कृषी उत्पन्न बाजार समितीत चणा-तुरीचे दर तेज; सोयाबीनलाही वाढता प्रतिसाद,धान्य विभाग प्रमुख सुनील ठोकळ
Akola, Akola | Nov 27, 2025 अकोला कृषि उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी 27 नोव्हेंबर रोजी विविध धान्यांच्या भावात चढ-उतार नोंदवले गेले. गव्हाला २१००-२५६०, ज्वारीला २०००-२३३५ तर चण्याला ४९००-५२८५ रुपये असा वाढीव दर मिळाला. तुरीने ६१००-६९४५ आणि सोयाबीनने ३७००-४४८० रुपये दर गाठला. मुगाचा भाव ४३०० कायम राहिला, तर उडीदाने ४३०५-६५०५ अशी उसळी घेतली. करडी ६००० आणि मका १६०० रुपये स्थिर राहिला. हे दर दुपारी 3 वाजेपर्यंतचे तात्पुरते असल्याची माहिती धान्य विभाग प्रमुख सुनील ठोकळ यांनी दिनांक 27 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता द