दि.बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया म्हणजेच भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने आज २६ नोव्हेंबर रोजी ७६ वा संविधान दीन साजरा करण्यात आला.नांदुरा शहरातील मोतीपुरा येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर सभागृह जवळ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.भारतीय बौद्ध महासभा तालुका अध्यक्ष संजय सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमाची सुरुवात सर्वप्रथम बुद्ध आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर व भारतीय संविधान यांचे पूजन करून त्रिशरण पंचशीलालने करण्यात आली.त्यानंतर भारतीय संविधान उद्देशिजेचे वाचन करण्यात आले