विठोली ता.आर्णी येथील ग्रामसेवक काजळे गेल्या अनेक महिन्यांपासून गावात हजर नसल्याने ग्रामपंचायतीचे सर्व कामकाज ठप्प झाले आहे. या गंभीर परिस्थितीवर सुधाकर बाबालाजी जाधव यांनी पंचायत समिती आर्णी येथे तक्रार अर्ज दाखल करून नवीन स्थायी ग्रामसेवक नेमण्याची तातडीची मागणी केली आहे. अर्जानुसार, गेल्या ६–८ महिन्यांत ग्रामसेवक केवळ काही वेळा गावात दिसले असून अनेक विकासकामे, प्रमाणपत्रे, सभा व प्रशासनिक प्रक्रिया अडकून बसल्या आहेत. ग्रामस्थांची गैरसोय वाढत असून गावाचा विकास पूर्णपणे ठप्प असल