उदगीर: सोमनाथपूर येथे आषाढी एकादशी निमित्त शालेय विद्यार्थ्यांनी काढली वृक्ष दिंडी
Udgir, Latur | Jul 5, 2025 सोमनाथपूर येथे आषाढी एकादशी निमित्त ५ जुलै रोजी वसंतराव नाईक विद्यालय शाळेतील विद्यार्थी वारकऱ्यांच्या वेशभूषेत टाळ विना, मृदंग, लेझीमच्या,गजरात गावातून वाजतगाजत वृक्ष दिंडी काढत गावातील लोकांना व पालकांना संदेश दिला, एक पेड मा के नाम एक मुल एक वृक्ष, झाडे लावा देश वाचवा, व्यसनापासून दूर राहा आरोग्य सांभाळा, आरोग्य ही संपदा, असे नारे देत पूर्ण गावात जनजागृती केली शाळेचे मुख्याध्यापक रामराव जाधव,आशा पवार, उमा जाधव,दक्षता समितीच्या अध्यक्षा शिवकर्णाताई अंधारे उपस्थित होत्या.