घाटंजी: लोकरवाडी येथील शेतकऱ्याची गळफास लावून आत्महत्या
पारवा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या सावळी सदोबा या ग्रामीण भागातील सुभाष नगर लोकरवाडी येथील शेतकरी पांडुरंग शंकर राठोड यांनी आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली.या घटनेची माहिती पारवा पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. या घटनेचा अधिक तपास पारवा पोलीस करत आहे.