भारसिंगी रोडवर फळांनी भरलेला एक ट्रक अनियंत्रित होऊन उलटल्याची भीषण घटना घडली. या अपघातात ट्रकचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, चालक गंभीर जखमी झाला आहे. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाहीmमिळालेल्या माहितीनुसार, फळांनी भरलेला हा ट्रक वेगाने जात असताना भारसिंगी रोडवर चालकाचे नियंत्रण सुटले आणि ट्रक थेट रस्त्याच्या कडेला उलटला. अपघात इतका भीषण होता की ट्रकचा पुढचा भाग पूर्णपणे चेपला गेला आहे.