नेर: वटफळा गावाजवळ अज्ञात ऑटोची दुचाकीला धडक लागून एक जण जखमी,नेर पोलिसात गुन्हा दाखल
Ner, Yavatmal | Nov 30, 2025 फिर्यादी कार्तिक नरेशराव आवठे यांच्या तक्रारीनुसार 11 नोव्हेंबरला फिर्यादीचे वडील नरेश आवठे हे त्यांच्या दुचाकीने जात असताना अज्ञात ऑटो चालकांनी त्याच्या ताब्यातील ऑटो भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवून फिर्यादीच्या वडिलांच्या दुचाकीस ठोस मारून अपघात केल्याने फिर्यादीचे वडील जखमी झाले. याप्रकरणी 29 नोव्हेंबरला दुपारी अंदाजे दोन वाजताच्या सुमारास नेर पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात ऑटो चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.