ग्रामीण भागात असलेल्या टाकळी -कुजबा शेतशिवारात वाघाने 2 वासरांची शिकार केल्याची घटना उघडकीस आली. याबाबत चे वृत्त असे की शेतकरी किशोर राजहंस सोमकुवर यांनी 2 वासरू शेतावर बांधून ठेवले होते. काही वेळाने शेतकरी शेतावर गेले असता 2 वासरू मृत अवस्थेत दिसून आले. त्यावरून चौकशी केली असता वाघाने दोन्ही वासरांची शिकार केल्याचे लक्षात आले.घटनेची माहिती वनविभाग,महसूल विभाग, पोलीस विभाग यांना देण्यात आली .