भंडारा: दहशत! कलेवाडा येथे अस्वलाचा हल्ला ताजा असतानाच कामकाझरी येथे वाघाने गायीला केले ठार
कलेवाडा परिसरात अस्वलाच्या हल्ल्याची घटना ताजी असतानाच आता वन्यप्राण्यांच्या वाढत्या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ३० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५.०० वाजण्याच्या सुमारास कामकाझरी येथील रहिवासी रमेश जगन झलके यांच्या मालकीच्या एका गाईला वाघाने हल्ला करून ठार केले. घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. परिसरातील वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी योग्य ठिकाणी कॅमेरे (Camera Traps) लावण्यात आले आहेत.