गुवाहाटी, आसाम येथून बनावट वेबसाईट तयार करून नागरिकांना बेकायदेशीररित्या लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्स मिळवून देणार्या आरोपीस स्थानिक गुन्हे शाखा व सायबर पोलीस ठाणे, जालना यांनी जेरबंद केले आहे. शनिवार दि. 31 जानेवारी 2026 रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार या कारवाईत अमर शिव भारती याला अटक करण्यात आली आहे. दि. 26 नोव्हेंबर 2025 रोजी फिर्यादी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाचे सहायक मोटार वाहन निरीक्षक अभीजित कडुबा बावस्कर यांनी तक्रार दाखल केली होती.