नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात नियमीत स्वच्छतेसोबतच वायू प्रदूषण प्रतिबंधात्मक मोहीमा प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. या अंतर्गत मुख्य रस्त्यांप्रमाणे एमआयडीसी क्षेत्रातील रस्त्यांचीही सखोल स्वच्छता केली जात आहे. यामध्ये रस्त्यांवरील माती ब्रशने तसेच फ्लपर मशिनने काढून ती वाहून नेण्यात येत आहे व रस्ते प्रक्रीयाकृत पाण्याने धुवून घेण्यात येत आहेत. या अनुषंगाने आज घणसोली विभागात रबाळे एमआयडीसी भागामध्ये आज महानगर टेलिफोन निगम लिमिटेड समोरील मुख्य रस्त्यावर वृषाली हॉटेल ते कल्पना हॉटेल पर्यंतच्या रस्त्यावर सखोल स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यामध्ये 30 स्वच्छताकर्मींचा समुह कार्यरत होता. त्यासोबतच याभागात एनकॅप वाहनाव्दारे हवेमध्ये कारंजासारखे पाण्याचे फवारे मारुन हवेतील धूळ कमी करण्यासाठी कार्यवाही करण्यात आली.