भिवंडी: भिवंडीच्या पाणी प्रकल्पासाठी मुंबई महापालिकेकडून मंजुरी, आमदार रईस शेख यांची माहिती
मुंबई महापालिकेने भिवंडीच्या ४५० कोटी रुपयांच्या १०० एमएलडी पाणी प्रकल्पासाठी ९९ वर्षांच्या भाडेपट्ट्यावर १२ एकर जमीन मंजूर केली आहे अशी माहिती भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांनी आज दिनांक ५ नोव्हेंबर रोजी रात्री साडेबाराच्या सुमारास दिली. या संदर्भातला त्यांनी एक चित्रफित तयार करून शेअर केल आहे. या प्रकल्पामुळे भातसा नदीतून पाणी येईल आणि भिवंडी शहरातील प्रत्येक घराला पाणीपुरवठा होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.