घनसावंगी: कुंभार पिंपळगाव येथे शासकीय कापूस खरेदी केंद्राचा शुभारंभ
घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथे आज मीनाक्षी फायबर जिनिंग अँड प्रेसिंग येथे भारतीय कपास निगम लिमिटेड आणि कृषी उत्पन्न बाजार समिती घनसावंगी यांच्या संयुक्त विद्यमाने शासकीय कापूस खरेदी केंद्राचा शुभारंभ करण्यात आला.या केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा कापूस शासनाने जाहीर केलेल्या आधारभूत किमतीनुसार खरेदी करण्यात येणार असून यामुळे परिसरातील शेतकरी बांधवांना मोठा दिलासा मिळणार आहे.