तालुक्यातील महालगाव येथे आयोजित भव्य खुल्या कबड्डी स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ* मोठ्या उत्साहात पार पडला. या स्पर्धेचे आयोजन महालगाव ग्रामस्थ व युवा मंडळाच्या वतीने करण्यात आले होते. स्पर्धेत परिसरातील नामांकित कबड्डी संघांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत अंतिम फेरी गाठलेल्या संघांमध्ये चुरशीच्या लढती पाहायला मिळाल्या. स्पर्धेत १४ संघानी भाग घेतला. यामधे प्रथम क्रमांक करडगांव संघाने पटकावले.