भुदरगड: मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा गौरव पुरस्कार गारगोटी पंचायत समिती सभागृहात आम.प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते संपन्न
भुदरगड तालुक्यातील गारगोटी येथे पंचायत समिती सभागृहात मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा तालुकास्तरीय गौरव पुरस्कार आम. प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. राज्यातील शाळांमध्ये स्पर्धात्मक वातावरण निर्माण व्हावे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा. या उद्देशाने राज्यात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे अभियान राबवण्यात आले होते.