कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथील श्री भागवत कथेस आज दिनांक १ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता भाविकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. कोळपेवाडी येथे मंजुश्रीताई थोरात निफाडकर यांच्या सुश्राव्य वाणीतून गेल्या चार दिवसापासून श्रीमद् भागवत कथा सुरू आहे.या निमित्ताने परिसरातील भाविक भक्तगण या भागवत कथा सोहळ्यास मोठ्या संख्येने हजेरी लावत आहे या कथेस भाविकांचा मोठा प्रतिसाद मिळत असून भाविक अक्षरशः श्रीमद् भागवत कथेत तल्लीन होत आहे.