हिंगणघाट नगरपालिकेच्या सभागृहात सभापती व स्टँडिंग कमिटीतील सदस्यांची नियुक्ती प्रक्रिया पार पडली. यामध्ये बांधकाम सभापती म्हणून चंदू माळवे, स्वास्थ्य विभाग सभापती म्हणून संजय माडे, पाणीपुरवठा सभापती म्हणून रवीला आखाडे तर महिला व बालकल्याण सभापती म्हणून वैशाली काळे व अश्विनी मानकर यांची नियुक्ती करण्यात आली.त्याचप्रमाणे स्टँडिंग कमिटी सदस्य म्हणून स्वीकृत सदस्य किशोर दिघे, राजू कामडी तसेच राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे ॲड. सुधीर कोठारी यांची निवड करण्यात आली. या न