आज दि 18 जानेवारी सकाळी 11 वाजता छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या सावंगी गणातील नायगाव येथे गावकऱ्यांनी विविध मूलभूत समस्यांचा पाढा वाचला आहे. गावामध्ये रस्ते, पाणीपुरवठा आणि ड्रेनेज यांसारख्या अत्यंत गंभीर समस्यांचा सामना नागरिकांना करावा लागत असल्याचे गावकऱ्यांनी स्पष्टपणे सांगितले. नागरिकांचे म्हणणे आहे की, रस्त्यांची अवस्था इतकी दयनीय आहे की गावातील मुख्य रस्त्यावर गुडघ्याएवढे मोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमध्ये साचलेले ड्रेनेजचे पाणी दररोज नागरिकांच्या अडचणी