उमरखेड: संविधान दिनानिमित्त ढाणकीच्या संविधान चौकात सीसीटीव्ही कॅमेरा भेट
ढाणकी शहरात संविधान दिन (२६ नोव्हेंबर) विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा झाला. या दिनाचे औचित्य साधून शहरातील संविधान चौक ठिकाणी सुरक्षा वाढवण्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचा उपक्रम राबविण्यात आला.'स्वप्निल चिकाटे मित्र मंडळ, ढाणकी' यांच्या वतीने ढाणकीच्या संविधान चौकामध्ये सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सीसीटीव्ही कॅमेरा भेट देण्यात आला.