'अरुणोदय' सिकलसेल ॲनिमिया विशेष मोहिमेत नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन स्वतःची तपासणी करून घ्यावी, असे आवाहन नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील बालरोग विभागाच्या माजी विभागप्रमुख तसेच सिकलसेल रोग निर्मूलन टास्क फोर्सच्या अध्यक्षा डॉ. दिप्ती जैन यांनी केले. नागरिकांना संबोधित करत त्यांनी सिकलसेल तपासणी, वेळेवर निदान व व्यापक जनजागृतीद्वारे सिकलसेलमुक्त समाज घडविण्याचा सशक्त संदेश दिला. यावेळी सार्वजनिक आरोग्य विभ