अंबरनाथ: बदलापूर रेल्वे स्थानकावर लोकलला उशीर झाल्याने प्रवासी संतापले
मध्य रेल्वेच्या कर्जत-बदलापूर मार्गावर आज दिनांक १ डिसेंबर रोजी सकाळी ५ च्या सुमारास पुन्हा एकदा लोकल गाड्यांना झालेल्या विलंबामुळे बदलापूर रेल्वे स्थानकावर प्रवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला. सकाळी ऐन गर्दीच्या वेळी मुंबईकडे जाणारी लोकल तब्बल २० ते २५ मिनिटे उशिराने धावत असल्याने नोकरदार आणि विद्यार्थ्यांचे मोठे हाल झाले. सकाळच्या वेळी कामावर वेळेत पोहोचण्यासाठी निघालेल्या प्रवाशांना लोकलची वाट पाहत प्लॅटफॉर्मवर ताटकळत उभे राहावे लागले.