शासनाने बंदी घातलेल्या नायलॉन मांजाच्या विक्रीविरोधात दहेगाव गोसावी पोलिसांनी मोठी कारवाई करत हमदापुर येथे छापा टाकून सुमारे साडेचार हजार रुपयांचा नायलॉन मांजा जप्त केला आहे. या प्रकरणी एका युवकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई दि. १५ डिसेंबर सोमवार रोजी दुपारी ४ वाजता करण्यात आली. नरेश वसंतराव चौधरी (वय १८, रा. हमदापुर, ता. सेलू असे कारवाई करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. अशी माहिती ता. १६ ला दहेगाव पोलिसांकडून देण्यात आली.