चिखली: पंढरपूर परत येणाऱ्या बसचा चिखली येथील महाबीज कार्यालयाजवळ अपघात बस मध्ये होते 52 वारकरी
पंढरपूर वरून परतणाऱ्या एसटी बसचा आज ७जुलैला पहाटे पावणे दोन वाजता भीषण अपघात झाला. बस डिव्हायडरला धडकून पलटली.. अपघातात बस क्षतिग्रस्त झाली.अपघात झाला त्यावेळी बसमध्ये पांडुरंगाच्या दर्शनणून परतणारे ५२ वारकरी होते.एम एच ४०, वाय ५८३० क्रमांकाची खामगाव आगाराची बस पंढरपूर वरून येत होते. पहाटे पावणे दोन वाजेच्या सुमारास मेहकर फाटा ते चिखली दरम्यान असलेल्या महाबीज कार्यालयासमोर बस डिव्हायडरला धडकली.