समुद्रपूर: हिरडी फाट्याजवळ उभ्या ट्रकाला मागून येणाऱ्या ट्रकची धडक:चालक जागीच ठार
नागपूर चंद्रपूर मार्गावरील हिरडी फाट्याजवळ उभ्या ट्रकवर मागून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने जबर धडक दिली या अपघातात धडक लागलाच चालक ट्रकमधून उडी घेऊन जमीवर पडून जागीच ठार झाला.प्राप्त माहितीनुसार रविवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास ट्रक क्रमांक एम एच ३४ बि.जी.२२१५ चालक सोराब पपू अहमद वय २० वर्ष राहणार बिएमटी चौक रेयतवारी कॉलनी चंद्रपूर हा ट्रक घेऊन जात असताना हिरडी फाट्याजवळ पार्किंग लाईट लावून नसलेल्या उभ्या ट्रकवर मागून जाऊन धडकला.यात चालक जागीच ठार झाला.