देशातील सर्वात व्यस्त आणि महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या मुंबई विमानतळाच्या दूर व्यवस्थेचा एक धक्कादायक व्हिडिओ उमरेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय मेश्राम यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट वर पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत त्यांनी विमानतळ प्रशासनाच्या कारभारावर ताशेरे ओढले आहे. त्यांनी पोस्ट केलेल्या या व्हिडिओमध्ये प्रवाशांची मोठी गर्दी बसण्यासाठी जागेचा अभाव आणि गोंधळाचे वातावरण स्पष्टपणे दिसत आहे.