कर्जत: भाजपा, शिवसेना, आरपीआय या महायुतीने बढत घेतलेली स्पष्ट दिसते आहे – आशिष शेलार
Karjat, Raigad | Nov 27, 2025 कर्जत नगरपरिषदेच्या निवडणुकीची धामधूम आणि प्रचाराचं रान याठिकाणी उठलेलं आहे ज्यामध्ये भाजपा, शिवसेना आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या महायुतीने बढत घेतलेली स्पष्ट दिसते आहे. अशी प्रतिक्रिया आज गुरुवार दिनांक २७ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी ४ च्या सुमारास सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी दिली.