पालांदूर येथील चुलबंद नदीपात्रातून विनापरवाना रेतीचे उत्खनन करून अवैध वाहतूक करणाऱ्या टोळीवर पालांदूर पोलिसांनी मोठी कारवाई केली असून, याप्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. १८ डिसेंबर २०२५ रोजी रात्री ९:४० वाजेच्या सुमारास उपविभागीय पोलीस अधिकारी (साकोली) यांच्या पथकाने मौजा मऱ्हेगाव येथील नदीपात्रात सापळा रचून रेतीने भरलेले तीन ट्रॅक्टर पकडले.