महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवा धोरणानुसार जिल्ह्यातील युवकांनी समाजहितासाठी पार पाडलेल्या भूमिकेचा आणि दिलेल्या योगदानाचा गौरव करण्यासाठी जिल्हा युवा पुरस्कार देण्यात येतो. सन 2024-25 चा जिल्हा युवा पुरस्कार (युवती) म्हणून सामाजिक व युवा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल करुणा अच्युत मोरे यांना प्रदान करण्यात आला. सोमवार दि. 26 जानेवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजता राज्याच्या पर्यावरण मंत्री तथा पालकमंत्री पंकजाताई मुंढे यांच्या हस्ते हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.