नवी मुंबई महानगरपालिकेच्या गार्डन विभागात गेल्या ५ वर्षांत सुमारे १०० कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा मनसेचा आरोप, २०२४ वर्षात गार्डन मधील खेळणी तसेच ओपन जिम साहित्य खरेदी व दुरुस्तीच्या टेंडर प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याचे समोर आले आहे. हेच गेल्या ५ वर्षात झाले असणार, वर्षभरात नवी मुंबई मनपाने ५ कोटीची झाडे नक्की लावलीत कुठे ? मनसेचा सवाल, अनेक कामात तेच तेच कंत्राटदार, सर्वसमावेशक टेंडर सुद्धा तब्बल १८ कोटी रुपयांच्या चढ्या दराने मंजूर करण्यात आल्याचा गंभीर आरोप, या संपूर्ण गार्डन घोटाळ्याची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करा,गार्डन विभागाची श्वेतपत्रिका काढावी व सर्व माहिती मनपाने संकेतस्थळावर टाकावी अशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ठाम मागणी. राज्यसरकारने ही लेखा परीक्षण करून स्वातंत्र्य ऑडिट करावे मनसे ची मागणी केली आहे.