कोलारगाव कोसबी व बक्की मेंडकी परिसरात गेल्या काही दिवसांपासून पट्टेदार वाघाचा मुक्त संचार सुरू असून मुख्य दळणवळणाच्या रस्त्यावर वाघ दिसत असल्याने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे या पार्श्वभूमीवर आज दिनांक २० डिसेंबर रोजी उपवनरक्षक अधिकारी गोंदिया यांचामार्फत वनपरिक्षेत्र अधिकारी सडक अर्जुनी यांना ग्रामस्थांच्या वतीने निवेदन देण्यात आले सदर निवेदनावर सचिन फुंडे कैलास चूटे विजय मेश्राम विनोद मोटघरे अनिल नाणे योगराज कुरसुंगे अरविंद मसराम घनश्याम करूं मुकेश ठाकरे प्रशांत कुरसुंगे