तालुक्यातील मेंढाच्या पराड येथे श्री चक्रधर स्वामी प्राथमिक आश्रम शाळेच्या वतीने तारीख 23 व 24 डिसेंबर दोन दिवशी मागास बहुजन कल्याण विभाग भंडारा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळा तारीख 23 डिसेंबर रोजी संपन्न झाला सदर उद्घाटन हे गटशिक्षणाधिकारी भगवान वरवटे तर सहाय्यक पोलीस निरीक्षक दिघोरी चे प्रमोद शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये पार पडले