धुळे: धुळ्यात चोरट्यांचा सुळसुळाट; सहजीवन नगरात भरदिवसा लाखोंची घरफोडी
Dhule, Dhule | Nov 29, 2025 धुळेतील चोरट्यांचा धुमाकूळ वाढत असून सहजीवन नगरात भरदिवसा झालेल्या घरफोडीने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. एसटी चालक संतोष शिंदे यांच्या बंद घरात बनावट चावीने प्रवेश करून चोरट्यांनी १०-१५ मिनिटांत २ तोळे सोने, २० भार चांदी व रोख रक्कम लंपास केली. सीसीटीव्हीत ते कैद झाले असून शेजाऱ्यांनीही त्यांना पाहिले. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.