शिरूर कासार: तिंतरवणी येथील तलावात सडलेल्या अवस्थेत एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला, ओळख पटवण्याचे चकलांबा पोलिसांचे आवाहन
बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यातील तिंतरवणी गावाला आज एक धक्कादायक घटना पाहायला मिळाली. येथील तलावाच्या पाण्यामध्ये एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह तरंगताना आढळल्याने संपूर्ण पंचक्रोशीत मोठी खळबळ उडाली आहे. या मृतदेहाची ओळख अद्याप पटू शकली नसून, चकलांबा पोलिसांनी नागरिकांना ओळख पटवण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन केले आहे. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत पाण्यावर तरंगताना आढळला असून प्राप्त माहितीनुसार, तिंतरवणी येथील तलावाच्या परिसरातील शेतकरी आज आपल्या कामासाठी गेले असत त्यांना आढळला.